aadhunikshetitantra.com

परतीच्या पावसाचा तडाखा : राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

A vertical shot of a female holding a red umbrella standing near a lake in the city during nighttime

पावसाची सुरुवात जून ला सुरू होते तर त्याचा परतीचा प्रवास हा सप्टेंबर ला होतो . पण सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आहे . महाराष्ट्रमध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय . काही जिल्हयांनी अलर्ट देखील दिले आहेत .

प्रादेशिक हवामान केंद्र यांनी दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे . तसेच पुढील काही दिवसात महाराष्ट्र मध्ये हवामानात बादल होणार आहे . दक्षिण कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे , तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजासह पाऊस व 30-40km प्रतीतास वेगाने वारे सुटू शकत , त्यामुळे शेतकर्‍यांनी आणि नागरिंकांनी काळजी घ्यावी . बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहे . आणि ते महाराष्ट्र च्या दिशेने वाहत आहे त्यामुळे राज्यात तीव्र पावसाची शक्यता आहे .

अलर्ट :

ओरेंज अलर्ट :

रायगड, रत्नागिरी , पुणे आणि सातार्‍याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . तसेच विजासह पाऊस असल्याने नागरिंकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .

यल्लो अलर्ट :

मुंबई , पालघर , सिंधुदुर्ग , ठाणे , कोल्हापूर , अहिल्यानगर , सातारा , पुणे , संभाजीनगर , जालना , अमरावती , नागपुर , नंदुरबार , धुळे , नाशिक , जळगाव , सांगली , सोलापूर , बीड , परभणी , हिंगोली , नांदेड , लातूर , धाराशीव , बुलढाणा , अकोला

सप्टेंबर हा महिना परतीच्या पावसाचा महिना असल्यामुळे या काळात पावसाचे स्वरूप अनिश्चित आणि अस्थिर असते . सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, भाजीपाला अशी अनेक पिके सप्टेंबरमध्ये परिपक्व होऊन काढणी ला येतात. परतीच्या पावसामुळे अनेकदा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे . परंतु या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे . पिके पाण्यात भिजल्यास उत्पादनाची गुणवत्ता कमी होते आणि बाजारभावावरही परिणाम होतो. काही दिवस पाऊस पूर्णपणे थांबतो तर काही भागात मुसळधार पाऊस व पुरस्थितीही निर्माण होऊ शकते.

Exit mobile version