aadhunikshetitantra.com

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात पिकांचे प्रचंड नुकसान | शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई

यावर्षी महाराष्ट्रमध्ये पावसाळा शेतकर्‍यांसाठी खूप कठीण ठरला आहे . महाराष्ट्रात पुरस्थिती मुळे तब्बल 65 लाख एकारांवरील पिकांचे नुकसान झाले आहे . सर्वात जास्त नुकसान मराठवाडा , विदर्भात झालेल आहे . ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या अतिवृष्टी मुळे शेतकर्‍यांच अतोनात नुकसान झालेल आहे . महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांना याचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे . सोयाबीन , कापूस , मूग , भाजीपाला , उस या पिकांच सर्वाधिक नुकसान झालेल आहे . तर काही शेतकर्‍यांच्या जमिनी ह्या नदीकाठी असतात तर यामुळे पुराच्या पाण्यामुळे शेतातील माती वाहून जाते. किंवा शेतामध्ये मातीचे ढीग होतात , तर धाराशीव जिल्ह्यातील बेलगाव पिपलगाव येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे 10 गायी वाहून गेल्या व 17 जागेवरच मृत्यूमुखी पडल्या . तसेच काही शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर व इतर शेतीसंबधी साधने याच ही प्रचंड नुकसान झाले आहे . तर काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे .

या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केल की , सरकार राज्य सरकार कडून शेतकर्‍यांना दिवाळी पूर्वीच नुकसान भरपाई देणार आहे , व ओला दुष्काळ या बद्दल सरकार विचार करत असल्याच सांगितलं

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामधून तब्बल 65 लाख 9 हजार 402 एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे . काही शेतकरी असे आहे की , अतिवृष्टीमुळे त्यांचं सरसकट नुकसान झालेल आहे . त्यामुळे ते चिंतेत आहेत कारण खरीप हंगाम तर गेला पण या हंगामात अनेक ठिकाणी जमिनी अतिवृष्टीमुळे जमिनीची रचना बदलली आहे , याचा परिणाम रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्वी मशागती वर अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे .

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की , राज्य सरकार कडून महसूल आणि कृषि विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत . ज्या ज्या ठिकाणचे पंचनाम्याचे काम पूर्ण झालेल आहे त्या ठिकाणी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिलेली आहे . पंचनाम्याच खूप काम अजून बाकी आहे . पण ज्या शेतकर्‍यांच अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल आहे , त्या शेतकार्‍याना राज्य सरकार कडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे . राज्य सरकारने दिलेले दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईचे आश्वासन शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरत आहे

Exit mobile version