शेतीमध्ये नवे प्रयोग करणारे, आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे आणि चांगले उत्पादन घेणारे शेतकरी व संस्था यांना कृषी विभागाकडून पुरस्कार दिले जाणार आहेत. अशा शेतकऱ्यांचे कौतुक व्हावे आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
कृषी विभागामार्फत शेती, फळबाग, कृषीपूरक व्यवसाय, कृषी विस्तार आणि संघटनात्मक कामामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, शेतकरी गट व संस्थांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारांमुळे प्रगतशील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच सामाजिक ओळख मिळेल, तसेच इतर शेतकऱ्यांनाही नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळेल.
हे पुरस्कार दिले जाणार
कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी विविध मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये –
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – रोख 3 लाख रुपये
- वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार
- जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
- कृषिभूषण शेतकरी पुरस्कार – रोख 2 लाख रुपये
- शेतीमित्र पुरस्कार – रोख 1.20 लाख रुपये
- उद्यान पंडित पुरस्कार – रोख 1 लाख रुपये
- वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सामान्य व आदिवासी गट) – रोख 44 हजार रुपये
- युवा शेतकरी पुरस्कार (वय 40 वर्षांपर्यंत) – रोख 1.20 लाख रुपये
सर्व पुरस्कारांमध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल-श्रीफळ देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक
- शेती हा मुख्य व्यवसाय असावा
- कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण काम केलेले असावे
- शेतीतून चांगले व स्थिर उत्पन्न मिळत असावे
- शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचा वापर केलेला असावा
- नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केलेला असावा
- इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे कार्य केलेले असावे
- कृषी विषयातील पदवी, पदविका किंवा प्रशिक्षण असल्यास प्राधान्य दिले जाईल
प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया
इच्छुक शेतकरी, गट व संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव 31 जानेवारीपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून गुणवत्तेनुसार पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे
शेतीत नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करत असाल तर या कृषी पुरस्कारांसाठी तुम्हीही अर्ज करा.
आपल्या मेहनतीला योग्य सन्मान मिळवण्याची हीच योग्य संधी आहे.
हे ही वाचा : महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ | राज्यात 13 उमेद मॉल, 200 कोटींचा निधी
Balwaan Krishi BS-21 Battery आणि Manual 2 in 1 Knapsack Sprayer (12V x 8Ah), 18 लिटर टँक व High Pressure स्प्रेयर आजच खरेदी करा.
