ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत कांद्याच्या बियांची पेरणी केली जाते. त्यानंतर डिसेंबर–जानेवारी महिन्यात तयार झालेल्या रोपांची शेतात पुनर्लागवड केली जाते.
एन–४–१ जातीचा कांदा आकाराने गोलसर असून मध्यम ते मोठ्या आकाराचा असतो. कांद्याला आकर्षक चमक येते आणि साठवण क्षमता चांगली असल्यामुळे ५ ते ६ महिने टिकतो. लागवडीनंतर साधारणपणे १२० दिवसांत काढणीस येतो. योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी सुमारे ३० ते ३५ टन उत्पादन मिळू शकते.
या गटामध्ये ऑग्रिफाउंड लाईट रेड, भीमा किरण, भीमा शक्ती, अर्का निकेतन या जातींचा समावेश होतो.
जाती
Multiplier Onion (मल्टिप्लायर कांदा):
Co-1, Co-2, MDU-1, Agrifound Red
Small Common Onion (लहान सामान्य कांदा):
Agrifound Rose, Arka Bindu
White Onion (पांढरा कांदा):
Bhima Shubhra, Bhima Shweta, Bhima Safed,
Pusa White Round, Arka Yojith, Pusa White Flat,
Udaipur-102, Phule Safed, N-257-9-1, Agrifound White
Spanish Brown (स्पॅनिश ब्राऊन कांदा):
Bhima Light Red, Bhima Kiran, Phule Suvarna,
Arka Niketan, Arka Kirthiman
Red Onion (लाल कांदा):
Bhima Super, Bhima Red, Bhima Raj, Bhima Dark Red,
Bhima Shakti, Punjab Selection, Pusa Red, N-2-4-1
कांदा लागवड रोपवाटिका व्यवस्थापन
- कांदा लागवडीसाठी ३–४ किलो बियाणे प्रति एकर लागते.
- पुनर्लागवडीसाठी रोपे ४५–६० दिवसांची असावीत.
- खरी लागवड करण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणारी जागा रोपवाटिकेसाठी निवडावी.
- रोपे लावण्यासाठी गादीवाफे तयार करताना खतांचा वापर करावा.
- ओळी ते ओळी अंतर १५ से.मी. ठेवावे.
- दोन रोपांतील अंतर १० से.मी. असावे.
- प्रत्येक वाफ्यात ८–१० पोती कुजलेले शेणखत द्यावे.
- प्रत्येक वाफ्यात २० ग्रॅम युरिया मिसळावा.
- प्रत्येक वाफ्यात १२० ग्रॅम सुपर फॉस्फेट द्यावे.
- प्रत्येक वाफ्यात ६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
- पुनर्लागवडीनंतर १० दिवसांनी पाणी द्यावे.
- पिकाच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाणी द्यावे.
- काढणीपूर्वी १०–१५ दिवस पाणी बंद करावे.
- पाने वाकू लागल्यानंतर कांदा उपटावा.
रोपांची पुनर्लागवड
- रब्बी हंगामात रोपांची लागवड १० × १० से.मी. अंतरावर करावी.
- लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात २० मिली हुमराज + १० ग्रॅम BEAT टाकून द्रावण तयार करावे.
- रोपे या द्रावणात बुडवून लागवड करावी.
तण नियंत्रण व खुरपणी
- कांदा रोपांची लागवडीनंतर खुरपणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.
- खुरपणी केल्यामुळे मुळांशी हवा खेळती राहते.
- त्यामुळे कांद्याची वाढ चांगली होते व पोषण योग्य प्रकारे होते.
- रब्बी कांद्याच्या पिकासाठी गोल किंवा सुपर टरगा ही तणनाशके वापरली जातात.
- तणनाशक फवारणीनंतर साधारणपणे ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
खत नियोजन
1) भारी जमीन – लागवडीपूर्वी बेसल डोस
- 10:26:26 – 150 किलो
- एस.एस.पी. – 50 किलो
- सल्फर – 6 किलो
- ROOT 98 – 500 ग्रॅम प्रति एकर
2) हलकी व मध्यम जमीन – लागवडीपूर्वी बेसल डोस
- 24:24:00 – 100 किलो
- एम.ओ.पी. – 75 किलो
- सल्फर – 6 किलो
- ROOT 98 – 500 ग्रॅम प्रति एकर
3) खताचा दुसरा डोस (लागवडीनंतर 40 दिवसांनी)
- 10:26:26 – 50 किलो
- एम.ओ.पी. – 70 किलो
- ROOT 98 – 500 ग्रॅम
- जमीन चुनखडीयुक्त असल्यास
अमोनियम सल्फेट – 25 किलो
रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर वाफसा अवस्थेत कर्नेल गोल्ड 20 किलो प्रति एकर द्यावे.
मर रोग किंवा रोप कोलमडणे
- बी पेरल्यानंतर किंवा पिकाच्या वाढीत बुरशीमुळे रोपे कमजोर होतात व मऊ पडतात; त्यामुळे कोलमडतात व नंतर सुकतात.
- रोगग्रस्त रोपांवर पांढरी बुरशी येऊन जमिनीजवळील भाग मऊ होतो, रोपे कोलमडतात.
- बी पेरणीपूर्वी BEAT/बीटी २–३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यावर लावावी.
- रोपे स्वच्छ गादी वा फ्या वर तयार करावीत, पाणी नीट द्यावे व रोपवाटिकेची जागा बदलावी.
- फवारणीसाठी बीटी २ ग्रॅम/लिटर आणि थोमेरू १.५ ग्रॅम/लिटर वापरावी, रोगाची जोखीम कमी होते.
जांभळा रोग
- हा रोग कांद्याच्या पिकामध्ये कुठल्याही टप्प्यात दिसू शकतो आणि पिकाचे ५०–७०% नुकसान करतो.
- सुरुवातीला पाने पांढरी–लांबट ठिपकेदार होतात; ठिपक्यांचा मधला भाग जांभळसर होऊन नंतर काळसर होतो.
- ठिपके पाने किंवा फुलांच्या दांड्यावरही दिसतात.
- रब्बी हंगामात (जानेवारी–फेब्रुवारी) पावसाळा किंवा ढगाळ वातावरण असल्यास रोगाची तीव्रता जास्त वाढते.
- उपाय: ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी; फवारणीसाठी बीटी २ ग्रॅम/लिटर आणि थोमेरू १.५ ग्रॅम/लिटर वापरावे.
- नत्रयुक्त खत जास्त प्रमाणात टाळावे आणि पिकांची फेरपालट करावी.

रसशोषक कीड नियंत्रक उपाय
१. रासायनिक उपाय
| कीड/प्रभाव | घटक व प्रमाण | पद्धत |
| सामान्य रसशोषक कीड | Thiamethoxam 25% WG – 8–10 g / 15 लिटर | Pump फवारणी |
| Thiamethoxam 12.6% + Lambda Cyhalothrin 9.5% (ZC) – Ventura 10–12 ml / 15 लिटर | Pump फवारणी | |
| Acetamiprid (HERRA) – 8–10 g / 15 लिटर | Pump फवारणी |
ऑर्गॅनिक उपाय
| कीड/प्रभाव | घटक व प्रमाण | पद्धत |
| थ्रिप्स, लाल कोळी | Jasmontes 2% + Fillar 90% + Stabilizer 8% (Capital+) – 1.5–2 ml / 15 लिटर | Pump फवारणी |
| Jasmontes 2% + Fillar 90% + Stabilizer 8% (Shinzoo+) – 1.5–2 ml / 15 लिटर | Pump फवारणी | |
| फुलकीडे, पांढरी मांडी आणि कोळी | Organic Material Maharaja – 25 ml / Pump | Spray |
| मांडी/तुडतुडे पांढरी, फुलकीडे, कोळी | Agev Americana plant extract + Albazia Proseta plant extract 85% QS (Tejas 279) – 12.5 g / Pump | Spray |
निंबोळी पेस्टचा वापर, योग्य डोस ओळीतून लागवड, निंबोळी अर्काची फवारणी व लागवडीपूर्वी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास पिकांची वाढ जोमदार होते, कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
हे ही वाचा – तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण: प्रभावी उपाय आणि मार्गदर्शन
आजच ऑर्डर करा : BALWAAN Krishi BS-20M 20L स्प्रेयर


