aadhunikshetitantra.com

Tadpatri Anudan Yojana 2025 : शेतकऱ्यांसाठी 50% अनुदान, अर्ज प्रक्रिया व पात्रता

Young indian banker or agronomist showing laptop screen with farmer at agriculture field.

महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असते. पीक कापणी नंतर ताडपत्रीची शेतकऱ्याला खूप गरज असते. अवकाळी पावसामुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतातील माल ओलाव्याने खराब होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशावेळी ताडपत्री (Tarpaulin) हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. चांगल्या क्वालिटीची ताडपत्री खूप महाग असते. म्हणून शासनाने शेतकऱ्यांना कमी खर्चात ताडपत्री उपलब्ध करून देण्यासाठी “ताडपत्री अनुदान योजना” सुरु केली आहे. या योजनेमध्ये ताडपत्री अनुदान योजनेमार्फत ताडपत्री वर 50% अनुदान मिळते. म्हणजेच अर्धी किंमत हि शेतकरी देणार आणि बाकीचे अर्धे  पैसे सरकार भरणार आहे.

1) अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.

2) ताडपत्री अनुदान योजनेचा मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे.

1) अवकाळी पावसामुळे व अनिश्चित हवामानामुळे पिकांचे संरक्षण होते.

2) या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होते कारण यामध्ये 50% रक्कम सरकार भरतं.

3) ताडपत्रीचे अनेक वापर करता येतात. जस कि, घरात काही कार्यक्रम असेल तर तेव्हा हि याचा वापर करता येतो.

4) ताडपत्रीची क्वालिटी जास्त चांगली असल्यामुळे पीक सुरक्षित राहते व उत्पन्न टिकून राहते.

 

1) ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2) अर्ज करणारा हा शेतकरी असणे आवश्यक आहे.

3) शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक.

4) SC / ST , दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य.

5) कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

6) ज्यांनी याच्या आधी या योजनेचा लाभ घेतला आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.

7) विकत घेतलेल्या ताडपत्री खरेदी व बिल जोडावे.

1) शेतकऱ्याचे ओळखपत्र

2) रहिवासी दाखला

3) जात प्रमाणपत्र (SC/ST)

4) बँक पासबुक

5) उत्पन्नाचा दाखला

6) आधार कार्ड

7) अर्ज

8) मोबाईल नंबर

9) पासपोर्ट फोटो

10) दिव्यांग प्रमाणपत्र

ताडपत्री अनुदान योजना 2025 अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागतो. सर्वप्रथम लागणारी कागदपत्रे एकत्र करून तालुका किंवा जिल्हा कृषी विभागात जमा करायची आहेत. अर्जात सर्व माहिती अचूक भरून कागदपत्रे जोडायची. तपासणीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होते. ताडपत्री अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि सोपी योजना आहे. या योजनेमुळे शेतमालाचे संरक्षण होते आणि नुकसान टाळून शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला की नाही, हे आम्हाला नक्की कळवा.

Exit mobile version