Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीमहाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे 65 वे अधिवेशन : अजित पवार यांचे शेतकऱ्यांना...

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे 65 वे अधिवेशन : अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 65 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या हस्ते पार पडले , या कार्यक्रमाच आयोजन पुण्यातील वाकड येथील हॉटेल  टिपटॉप इंटरनॅशनलमध्ये करण्यात आल होत या प्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकरराव मांडेकर, केंद्रीय फलोत्पादन विभागाचे उपसचिव संजय सिंह, राज्याचे कृषी आयुक्त हेमंत वसेकर, संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पुणे एनआरसीजीचे संचालक कौशिक बॅनर्जी, तसेच चिली देशातील द्राक्ष तज्ज्ञ प्रा. कार्लोस फ्लोडी उपस्थित होते.याशिवाय संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, खजिनदार शिवाजीराव पवार आणि मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन यांचीही उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , शेतकरी हीच आपली जात आहे , जातीभेद कधीच केला नाही , आपण सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो आहोत . केंद्र व राज्य सरकर शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवत असत . हे युग कृत्रिम बुद्धिमता (AI) च आलेल आहे , आणि ही एक काळाची गरज बनली आहे . तर त्याचा वापर तुम्ही करा . तसेच ते पुढे म्हणाले, यावेळी अर्थसंकल्पना सादर करत असताना आवर्जून कृषि विभागासाठी 500 कोटींची तरतूद केली गेली आहे .

द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केलेल्या मागण्या आगामी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, आपण च उत्पादित केलेला माल हा भारतामध्येच भारतीयांनी घेतला तर खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे ,शेतकऱ्यांनी या बाजारावरही लक्ष केंद्रित केल पाहिजे. आपण जे उत्पादन घेतो त्यासाठी स्वतंत्र आणि मोठी बाजारपेठ उभी करण्याची गरज आहे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. द्राक्ष पिकासाठी राज्य सरकार ड्रीप सिंचन व फवारणीसाठी अनुदान उपलब्ध करून देत असून, या योजनेत महिला बचतगटांना विशेष प्राधान्य मिळणार आहे.

पुढे ते म्हणाले , गरिबातील गरीब शेतकर्‍याची प्रगति झाली पाहिजे  यासाठी राज्य व केंद्र सरकार काम करत आहे , तसेच अध्यक्षांनी ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर मुंबई मध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ . व ज्या शेतकर्‍यांच पावसामुळे नुकसान झाल आहे त्याचे पंचनामे करून त्या शेतकर्‍याला परत उभ कस करता येईल या गोष्टीवर बारकाईने लक्ष देणार .

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी स्वतः द्राक्ष बागायतदार असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या जाणतो. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व बाजारपेठ मिळावी यासाठी राज्याचा कृषी विभाग नेहमी प्रयत्नशील राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments