aadhunikshetitantra.com

GI Food : भौगोलिक निर्देशांक, आजरा घनसाळ तांदळाचे वैशिष्ट्य

GI Food आजरा घनसाळ तांदूळ

GI Food आजरा घनसाळ तांदूळ : म्हणजे असा अन्नपदार्थ, जो एखाद्या ठरावीक भागातच पिकतो आणि ज्याची चव, सुगंध व गुणवत्ता त्या भागाशी जोडलेली असते. त्या भागातील माती, पाणी, हवामान आणि शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत यामुळे असे अन्न खास बनते.

वैशिष्ठ्ये

नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळे आजरा आणि कोकणलगतच्या भागात घनसाळ भाताचे उत्पादन सातत्याने होते. पूर्वी फक्त सुवासामुळे या तांदळाला मागणी होती, मात्र विक्री प्रामुख्याने जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहायची. त्यामुळे उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नव्हता. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि आजरा घनसाळची ओळख वाढावी यासाठी GI मानांकनासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि याला GI मानांकन मिळालं. आणि आता या तांदळला खूप पसंदी दिली जात आहे.

आजरा घनसाळच्या तांदुळचा सुवास :

पावसाळ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून पाणी खाली येते. या पाण्यासोबत जंगलातील कुजलेला पाला-पाचोळा, झाडांची पाने, तसेच सेंद्रिय पदार्थ वाहून येतात. हे सगळे घटक डोंगर उताराला लागून असलेल्या सपाट शेतजमिनीत साचतात.

या कुजलेल्या पाला-पाचोळ्यातून अनेक नैसर्गिक अन्नघटक तयार होतात. पावसाचे पाणी हे अन्नघटक जमिनीत मिसळते आणि ते जांभा खडकाच्या मातीत खोलवर साठून राहतात

या तांदळाला असा सुवास नेमका कसा मिळतो, याबाबत शास्त्रीय पातळीवर सध्या अभ्यास सुरू आहे. मातीतील अन्नघटक, हवामान, पाण्याची गुणवत्ता आणि पारंपरिक शेतीपद्धती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम घनसाळ तांदळाच्या खास गुणधर्मांवर होत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

हे ही वाचा : रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट: जानेवारीपासून कुणाला किती धान्य मिळणार?

Exit mobile version