aadhunikshetitantra.com

गहू उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स | व्यवस्थापन योजना

गहू पीक

गहू उत्पादन वाढवण्यासाठी व्यवस्थापन

गहू उत्पादन वाढवण्यासाठी व्यवस्थापन – महाराष्ट्रात घेतल्या जाणार्‍या प्रमुख रब्बी हंगामातील पिकांपैकी गहू हे अत्यंत महत्त्वाचे धान्यपीक मानले जाते. हवामानातील बदल आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, गहू हे एक जिरायती आणि बागायती दोन्ही परिस्थितीत यशस्वीपणे लागवड करता येते . जर शेतकर्‍यांनी योग्य उपाय योजना व शेती तंत्रज्ञान यांचा अवलंब केल्यास उत्पादनात 25-30% पर्यंत वाढ होते. देशा अंतर्गत गव्हाची मागणी जास्त असल्याने बाजारभावत स्थिरता असते. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांसाठी गहू हे पीक नियमित रोख उत्पन्नाचे साधन आहे

जमिनीची निवड:

गहू पिकासाठी चांगल्या निचर्याची भारी ते मध्यम जमिनीची निवड करावी. बागायती गव्हासाठी भारी व खोल जमिनीची निवड करावी. व जिरायती गव्हासाठी भारी जमिनीची निवड करावी

सुधारित वाण:

बीज प्रक्रिया:

गहू पेरणीपूर्वी बियाण्यावर योग्य प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

आणि पिकाला सुरूवातीपासून रोगांचा प्रतिकरशक्ती मिळते.

पेरणी:

पेरणी करताना दोन ओळी मधील अंतर 20 सेमी असावे , व पेरणी 5-6 सेमी खोल पेरावे. याच्या पैक्षा जास्त खोल पेरु नका. उभी आडवी पेरणी करू नये . एकेरी पेरणी करावी. यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते.

गहू उत्पादन वाढवण्यासाठी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन

अ) शेणखत मिश्रण

प्रति हेक्टर सुमारे १५ ते ३० गाड्या चांगल्या प्रतीचे कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळावे.

आ) बागायती गहू पेरणीपूर्व खत

इ) उशिरा पेरणी केलेल्या गव्हासाठी खत

ई) जिरायती गहूसाठी खत

उ) सूक्ष्मजीवयुक्त जैवखत

पेरणीपूर्व बीजप्रक्रियेसाठी अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा.
प्रति १० किलो बियाण्यावर २५० ग्रॅम प्रमाणात प्रक्रिया करावी.

पाणी व्यवस्थापन

बागायती गहू पिकामध्ये जमिनीच्या पाण्याच्या क्षमतेनुसार पाणी देण्याची वेळ बदलते.

गहू पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर (गोंड अवस्थेत, तुरी फुलण्याच्या आधी, दाणे भरण्याच्या काळात) पाणी मिळाल्यास उत्पादनात चांगली वाढ दिसून येते.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

१) तांबेरा

हा रोग हवा आणि पाण्याद्वारे पिकात पसरतो. या रोगामुळे पाने फिकट पिवळसर किंवा नारिंगी डागांनी भरतात आणि नंतर हे डाग काळसर होऊन कोरडे पडतात. शेवटी पाने गळून उत्पादन घटते. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तांब्याच्या आधारे तयार केलेले बुरशीनाशक वापरावे.

उपाय :
२) काजळी (करी)

काजळी रोग बियांमार्फत आणि पिकामध्ये एक रोपापासून दुसऱ्या रोपात पसरतो. पानांवर व देठावर काळसर राखी थर दिसतो आणि वाढ कमी होते.

उपाय :
३) पाने करपणे (Leaf Blight)

या रोगामुळे पानांवर करपलेल्या आकाराचे तपकिरी ते काळे डाग दिसतात आणि हळूहळू पाने वाळतात. गंभीर अवस्थेत पिकाच्या वाढीवर थेट परिणाम होतो.

उपाय :
प्रतिबंधात्मक उपाय

शेतकरी बांधवांनो, योग्य नियोजन, संतुलित खत वापर, पुरेशा सिंचनाचे नियमन आणि रोग नियंत्रण या तत्त्वांचा अवलंब केल्यास निश्चितच गहू उत्पादनात वाढ होते . आधुनिक तंत्रज्ञान वापरा आणि अधिक उत्पन्न मिळवा.

वाचल्याबद्दल धन्यवाद! पुढील लेखांसाठी जोडलेले रहा आणि आपली मते आम्हाला कळवत रहा.

हे ही वाचा : वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान: आता पीक विम्यातून थेट आर्थिक मदत

Exit mobile version