महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” चा राज्यस्तरीय शुभारंभ आज (17 सप्टें. 2025) मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका फुलंब्री येथील किनगाव येथे झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थित असलेल्या नागरिकांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम या दिनांची वैशिष्ट्य साधून आयोजित करण्यात आला.

- लखपती दीदी –
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि महाराष्ट्रामध्ये 1 कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवण्याचा उद्देश सरकारने केला आहे. ज्या महिला लाडक्या बहिणी 1500/- रुपयांचा लाभ घेतात त्या फक्त त्यावर अवलंबून न राहता त्यांना जिल्हा बँकेकडून 1 लाख रुपयांचं बिनव्याज कर्ज देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करणं, सरकारनं यासाठी पावले उचलण्याचे ठरवले असून जिल्हा बँकेकडून प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी पतसंस्था सुरु करून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत करणं या सर्व गोष्टींशी सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी राहील. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक साहाय्य मिळून त्यांना लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी मोठी चालना मिळेल.
त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले कि, मराठवाड्यातून दुष्काळ मुक्त करू, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” हि योजनांची कार्यवाही करून लाभ देणारे आणि प्रत्येक ग्रामस्थाला आत्मसन्मानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा मूळ गाभा आहे. तर राज्यांमध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंम्बर या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविले जाणार आहे.
- सेवा पंधरवडा –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाने प्रगती केली असून 25 कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले आहेत. आज 15 कोटी लोकांना स्वतः चे घर उपलब्ध होऊ शकते. लोकांच्या जीवनात परिवर्तन आले, हे सगळं पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात घडले. तर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु करण्यात आलं आहे.
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान –
या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून प्रत्येक गावांगावातून समृद्ध महाराष्ट्र घडेल कारण ग्रामविकासाच्या अनेक योजना, अभियाने येतात पण त्यात ठराविक गावंच पुढं गेली तर अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरु केले आहे.
या अभियानात केंद्र आणि राज्य शासनांच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील त्या माध्यमातून राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती आणि 40 हजार गवे मॉडेल म्हणून विकसित करू असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना –
1) तालुकास्तर –
प्रथम -15 लाख
द्वितीय – 12 लाख
तृतीय – 8 लाख
2) जिल्हास्तर –
प्रथम – 50 लाख
द्वितीय – 30 लाख
तृतीय – 20 लाख
3) राज्यस्तर –
प्रथम – 5 कोटी
द्वितीय – 3 कोटी
तृतीय – 2 कोटी
या रुपयांची बक्षीसे मिळणार आहेत.



