आजच्या बदलत्या तंत्रज्ञानयुक्त युगात आपल्या पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती ही नवीन कल्पना आत्मसात कारण गरजेचं बनल आहे . शेतकर्यांना जगत शेतीबद्दल होणार्या बदल तसेच विकसित होणारे तंत्रज्ञान हे शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रगटशील शेतकर्यांसाठी “परदेश अभ्यास दौर्यांची संधी” उपलब्ध करून दिली आहे . या दौर्यामुळे शेतकर्यांना जागतिक स्तरावर जाऊन तेथील आधुनिक कृषि तंत्रज्ञान , शाश्वत शेती , पाण्याचे व्यवस्थापन , पीक प्रक्रिया व साठवण , शेती संबंधित उद्योग यांचा अनुभव घेता येणार आहे
दौरा कुठे?
या योजनेअंतर्गत निवडक शेतकर्यांना थायलंड, पेरु, व्हीयतनाम , सिंगापूर , ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, स्पेन, मलेशिया, नेदरलंड, ब्राजील यासारख्या संभाव्य शेती प्रगत देशांना प्रगतशील शेतकर्यांना पाठवल जाणार आहे. राज्यातील पात्र आणि प्रगतशील शेतकऱ्यांची विविध स्तरांवरील निवड प्रक्रियेद्वारे अंतिम निवड करून, त्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनामागील मुख्य उद्देश आहे.
पात्रतेचे निकष:
वैद्यकीय पात्रता:
कृषी विभागाकडून निवड झाल्यानंतर, एमबीबीएस डॉक्टरकडून शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
तसेच कोरोनासंदर्भातील तपासणी अहवाल सादर करणे बंधनकारक.have to stay true to your heritage, that’s what your brand is about.
शेतकरी असणे आवश्यक:
अर्जदार स्वतः शेतकरी असावा आणि शेतीत प्रत्यक्ष कार्यरत असावा.
7/12 व 8अ उतारे:
अर्जदाराच्या नावावर चालू कालावधीचा 7/12 व 8अ उतारा असणे आवश्यक आहे.
शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन:
उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतीच असल्याचे स्वघोषणापत्र (प्रपत्र-1) मध्ये नमूद करणे बंधनकारक आहे.
एकच लाभार्थी (कुटुंबातून):
एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
(कुटुंब = पती, पत्नी व १८ वर्षाखालील मुले/मुली)
वंशावळ प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत आवश्यक.
आधार कार्ड:
आधार कार्डाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता:
अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असावा. प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा:
दौऱ्याच्या सुरुवातीस २५ वर्षे पूर्ण आणि दौरा संपेपर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वयाची खातरजमा पासपोर्टवरील जन्मतारीखेवरून केली जाईल.
वैध पासपोर्ट:
अर्जदाराकडे वैध पासपोर्ट असावा.
पासपोर्ट दौऱ्याच्या तारखेपासून किमान ६ महिने वैध असणे आवश्यक.
शासकीय/खाजगी नोकरी नको:
अर्जदार कुठल्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरी करत नसावा.
तसेच डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, कंत्राटदार इत्यादी व्यावसायिकही अपात्र.
याचेही स्वघोषणापत्र (प्रपत्र-1) आवश्यक.
पूर्वी परदेश दौरा घेतलेला नसावा:
अर्जदाराने यापूर्वी शासकीय खर्चाने परदेश दौरा केला नसावा. याचेही स्वघोषणापत्र आवश्यक.
