aadhunikshetitantra.com

“कापसाच्या सर्वोत्तम वाण: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निवडी

कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी नगदी पीक असून, राज्यातील कोरडवाहू आणि अंशतः सिंचित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांचे पांढरे सोने” म्हणून ओळखला जाणारा कापूस केवळ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतो, तर कापडउद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व निर्यातीसुद्धा चालना देतो. महाराष्ट्रमध्ये कापूस उत्पादनासाठी विविध वाण बाजारात आहे. खालील पाच प्रमुख कापूस वाण महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत व जास्त उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

            ही एक उच्च दर्जाची बीटी कापूस जाती असून, ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. ही जात विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. US-7067 BG II ही Bollgard II तंत्रज्ञानावर आधारित असून ती बोंडअळी आणि इतर चूसक कीटकांपासून प्रभावी संरक्षण देते .सिंचित तसेच कोरडवाहू दोन्ही प्रकारच्या शेतजमिनीसाठी उपयुक्त आहे. योग्य खते व्यवस्थापन आणि वेळेवर पाणी दिल्यास ही जात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देते. शिवाय, या जातीचा जिनिंग टक्का सुमारे ६५–६७% असून बाजारातही याला चांगला दर मिळतो. त्यामुळे US-7067 BG II ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह व फायदेशीर कापसाची जात आहे

          प्रति एकर उत्पादन 10 ते 18 क्विंटल (साधारण)

RCH 578 BG II (Neo) कापूस ही रासी सिड्स कंपनीची एक अत्याधुनिक बीटी कापूस जात आहे, जी विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस केली जाते या जातीत Bollgard II तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे बोंड अळी आणि इतर चूसक कीटकांपासून चांगले संरक्षण मिळते  उत्पादन क्षमता प्रति एकर १० ते १५ क्विंटल पर्यंत असते. ही जात सिंचित तसेच कोरडवाहू दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आहे आणि बाजारात चांगला दर मिळवतो. त्यामुळे, RCH 578 BG II (Neo) शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर कापूस जात आहे, जी उच्च उत्पादन आणि चांगली बाजारभाव देणारी आहे.

          ही महिको कंपनीने विकसित केलेली एक उच्च दर्जाची बीटी कापसाची जात आहे, जी विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू अशा राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस केली जाते. या जातीची बोंडधारण क्षमता खूप चांगली असून बोंडांचे वजन अंदाजे ५.५ ते ६ ग्रॅमपर्यंत असते. बोंडे गोलसर, एकसंध आणि बाजारासाठी उपयुक्त असतात. या जातीमध्ये बोंडे एकसारखी फुटतात आणि त्याचा जिनिंग टक्का चांगला असतो, ही जात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे, या जातीचे सरासरी उत्पादन 0 ते 25 क्विंटल प्रति एकर पर्यंत पोहोचू शकते, जर पीक व्यवस्थापन चांगले आणि हवामान पोषक असेल

       ही तुलसी सिड्स कंपनीने विकसित केलेली एक उच्च दर्जाची बीटी कापसाची जात आहे, जी विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस केली जाते. सैराट BG II ही जात कोरडवाहू आणि सिंचित दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे., योग्य व्यवस्थापन आणि पिकाच्या स्थितीनुसार, सुमारे 0 ते 25 क्विंटल प्रति एकर पर्यंत होऊ शकते. याची बोंडधारण क्षमता खूप चांगली आहे, सैराट ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि तिची बाजारातील मागणी सातत्याने वाढत आहे

          ही तुलसी सिड्स कंपनीची एक सुधारित बीटी कापसाची जात आहे, जी महाराष्ट्रासह इतर प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी शिफारस केली जाते. ही जात विशेषतः उच्च उत्पन्न क्षमता, चांगली बोंडधारण आणि किड-सहनशक्तीसाठी ओळखली जाते. कापूसाची उत्पादन क्षमता सामान्यतः २५ ते ३० क्विंटल प्रति एकर  जाते या जातीमध्ये चूसक व इतर प्रमुख किडींविरुद्ध चांगली प्रतिकारशक्ती असल्यामुळे पीक सुरक्षित राहते.

 

Exit mobile version