aadhunikshetitantra.com

GST दरकपातीमुळे अर्थव्यवस्थेत येणार ₹2 लाख कोटी, मध्यमवर्गाला मोठा दिलासा

भारतामध्ये जीएसटी (वस्तु आणि सेवा कर) लागू होऊन अधिक कल झाला आहे या दरम्यान वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत . ट्रेड अँड इंडस्ट्रीज असोसिशियन , ट्रक्स रेफोर्म रायझिंग भारतच्या वतीने चेन्नई येथील परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बोलत होत्या की , वस्तु आणि सेवा करातिल कर कपातीमुळे अर्थ व्यवस्थेमध्ये तब्बल दोन लाख रुपयांची भर पडेल असा विश्वास त्यांनी दाखवला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की 2017 मध्ये केवळ 65 लाख करदाते जीएसटीच्या कक्षेत होते, मात्र आज हा आकडा दीड कोटींच्या पुढे गेला आहे. या मागे सर्व राज्यांचा सहभाग आहे .
महसूल गोळा करण्याच्या बाबतीतही सध्याचा  आकडा ₹22.08 लाख कोटींवर पोहोचला आहे. तुलना केली तर 2018 मध्ये हा  आकडा फक्त ₹7.18 लाख कोटी  इतका होता. वस्तु आणि सेवा करांचा फायदेशीर परिणाम सकाळ पासून रात्री झोपेपर्यंत सर्वच उत्पादनावर राहील . तसेच त्या म्हणल्या की , जीएसटी मध्ये जे काही बदल केले आहेत , त्यामुळे जवळजवळ 2 लाख कोटी रुपये सर्वसामान्य लोकांपर्यंत जातील. यामध्ये 90% वस्तु अशा ज्यांचा कर आधी 12% होता त्या वस्तु आता 5% स्लॅब मध्ये येतील . यामुळे याचा फायदा सर्व सामान्य लोकांना जास्त होईल कारण 5% स्लॅब मध्ये आवश्यक आणि दैनंदिन वापरातील आहेत . जस की टुथब्रश , साबण , शांपु , पॅक केलेले धान्य आणि डाळी ई या अशा वस्तु येतात , यामुळे नागरीकाना रोजच्या वापरतील वस्तूसाठी कमी टॅक्स भरावा लागेल . त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांनासाठी ही गोष्ट चांगली आहे .

चेन्नई मध्ये ‘नेक्स्ट जेन जीएसटी रेफोर्म ‘ या कार्यक्रमा मध्ये त्या बोलत होत्या , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जीएसटी दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे . त्यासाठी आठ महीने काम सुरू होत यांच्या मागच्या उद्देश असा होता की नागरिकांना सणासुदीच्या काळात वस्तु खरेदी करण सोप व्हावं . जीएसटी दर कपातीमुळे अशा अनेक वस्तु 5% स्लॅब मध्ये आल्या आहेत . त्यामुळे दैनंदिन वापरातिल खाण्याच्या वस्तु , कपडे , मिठाई , बिस्किटे यांसारख्या उत्पादनांच्या किमती कमी होतील त्यामुळे थेट नागरिकांची बचत होईल

Exit mobile version