आपल्या महाराष्ट्रात शेतीसलग्न व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकड बघितलं जात .आणि दुग्धव्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो , यासाठी सरकार नवीननवीन योजना राबवत असत. पशुसंवर्धंन खात्यात अशा अनेक योजना असतात पण त्या योजना शेतकर्यांना माहिती नसतात. याच योजनेपैकी एक योजना म्हणजे गाय गोठा अनुदान योजना. या योजनेसाठी सरकार तब्बल 3 लाखापर्यंत अनुदान शेतकर्यांना देत आहे . ही योजना पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र सरकार यांच्याकडून राबवली जात आहे.
या योजनेमध्ये शेतकर्यांना गोठा बांधण्यासाठी गायी-म्हशी च्या संख्येनुसार अनुदान दिल जाणार आहे . या योजनेच मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. काहीवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय करावा यासाठी सरकार प्रोत्साहन देते . तसेच ग्रामीण भागातील लहान व मध्यम प्रवर्गातील शेतकर्यांना आर्थिक अडचणी असल्यामुळे गोठ्याच इतक पक्क बांधकाम नसत , त्यामुळे मोठा पाऊस किंवा मोठ वार-वादळ आल्यामुळे जनावरांना हानी होऊ शकते याच कारणामुळे सरकार न पुढाकार घेत ही योजना 2021 पासून राज्यात सुरू करण्यात आली तर आपण या योजनेसाठी पात्रता , अर्ज कुठे व कसं करायचा ते पाहू .
गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
किमान 2 आणि जास्तीत जास्त 18 जनावरे असावीत.
स्वतःची जमीन गोठा बांधण्यासाठी असावी.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड – पशुपालक / शेतकरी
रहिवासी पुरावा – शेतकऱ्याचा
मोबाइल नंबर
स्वतःच्या जमिनीचा पुरावा – 7/12, 8-अ उतारा, नमुना 9 उतारा
बँक खात्याचा तपशील
ग्रामपंचायत शिफारस पत्र
गोठा बांधणीचा आराखडा आणि जनावरांची माहिती
जनावरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र
पाण्याची व मूत्र टाकी असल्याचा पुरावा – फोटो किंवा बिल

गाय गोठा अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
राज्य सरकारने गाय गोठा अनुदान योजना साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन सोयीस्कर पद्धती उपलब्ध आहेत —
1) ऑफलाइन पद्धत
- आपल्या गावातील ग्रामपंचायतीत जाऊन योजनेचा अर्ज फॉर्म घ्या.
- आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून पशुसंवर्धन विभागाकडे सादर करा.
2) ऑनलाइन पद्धत
- सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- अर्ज फॉर्म ऑनलाइन भरून, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.



