सध्या लम्पि आजारान महाराष्ट्र राज्यात चांगलंच थैमान घातलं आहे. तर आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
लम्पि स्किन डिसीज (LSD) हा एक संसर्ग जन्य आजार आहे आणि हा आजार जनावरांमध्ये होतो पण विशेषतः याच जास्त प्रमाण गायीमध्ये दिसून येते. या आजारांमुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण होतात, याचा परिणाम दूध उत्पादनात घट होते. या आजारामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप तणाव निर्माण होत आहे. या रोगाचा प्रभाव दोन ते तीन आठवडे दिसून येतो.
लक्षणे –
1) त्वचेवर गाठी (Lumps) –
त्वचेवर हळूहळू 10 mm इतक्या आकाराच्या गाठी दिसायला लागतात. विशेषतः मान, पाठीवर, पाय, मायांग, पाय, कास यावर असतात.
2) डोळे, नाक आणि तोंडातून स्त्राव –
प्रथम जनावरांच्या डोळ्यातून पाणी येते, नाक आणि तोंडातून द्रवस्त्राव दिसून येतो.
3) ताप –
जनावरांना या संसर्ग झाल्यानंतर 8-9 दिवसांनी ताप येतो. हा ताप 40° से. पेक्षा जास्त असतो आणि तापांमुळे जनावरांची हालचाल कमी होते.
4) चारा खाणं व पाणी पिणं कमी करतात –
या काळात जनावर चारा कमी खातात, त्यांना भूक लागत नाही आणि यामुळे वजन हळूहळू घटत व त्यांना अशक्तपणा येतो व ते कमी हालचाल करतात.
5) पायांवर सूज येते –
जनावरांच्या पायाला सूज येते आणि वेदना होतात त्यामुळे जनावर लंगडतात. व गायींना उभं राहण्यात त्रास होतो.
6) दुधात घट येते –
जनावरांच्या दुधात 50% पर्यंत घट होण्याची शक्यता असते.
7) प्रजननावर परिणाम –
काही गायींमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते, आणि प्रजननक्षमतेवर याचा परिणाम होतो. जनावरांमध्ये गाभण राहण्याची क्षमता कमी होते.
उपचार –
1) गोठ्यात माशा, डास होणार नाहीत याची काळजी घ्या यासाठी तुम्ही सुकी कडुनिंबाच्या पानाची धुरी देऊ शकतात.
2) गोठा नेहमी स्वच्छ ठेवा, पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्या.
3) ज्या गायी म्हशींना लम्पिची लागण झाली आहे त्यांना निरोगी जनावरांपासून वेगळ्या ठिकाणी बांधून ठेवा.
4) चरण्यासाठी बाहेर सोडू नका.
5) लम्पि जनावरांना तपासणीसाठी आलेले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे हाथ किंवा पोशाख सॅनिटाईज करावा.
6) जनावरांची वाहतूक बंद ठेवावी, तसेच जनावरांचे बाजार देखील बंद ठेवावे.
7) तसेच प्रतिकारकशक्ती वाढवणारी औषधे आणि आहार द्यावा.
8) जनावर हाताळताना वापरत येणाऱ्या वस्तूंचं निर्जंतुकीकरण करावं.
9) लम्पि आजारासाठी “लम्पि – प्रोव्हक ईंड” हि लस बाजारात उपलब्ध आहे. तसेच “गोट पॉक्स” हि सुद्धा लस वापरता येते. 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गायी – म्हशींना 1ml लस द्यावी.
10) लसीकरणामुळे आजाराचा प्रादुर्भाव कमी होतो.
