बैलपोळा विशेष : आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे . दरवर्षी बैलपोळा हा अमावास्या च्या दिवशीच येतो , याला पिठोरी अमावास्या आस ही म्हणतात . भारतामध्ये जवळजवळ 60-70% शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात . वर्षभर राबणार्या , कष्ट करणार्या बैलाला शेतातील कामापासून आराम दिला जातो , बैलपोळा हा जास्त महाराष्ट्र , कर्नाटक , आणि तेलंगणा या राज्यात केला जातो . या सणाच मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे शेतकरी आपल्या बैलांबद्दल प्रेम , आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो
गावांमध्ये बैलपोळा कसा साजरा करतात ?
या दिवशी सकाळी बैलांना स्वच्छ धुतल जात , त्यानंतर त्याच्या शरीरावर हळदीने रंगवले जाते आणि परांपरिक नक्षी किंवा चिन्हे रेखाटली जातात , तसेच झूल , फुलाच्या माळा घालून सुंदर सजवले जाते. प्रत्येकाच्या घरात चिखलाचे बैल आणले जातात आणि त्यांचीही पूजा करतात . महाराष्ट्र मध्ये प्रत्येकाच्या घरात या दिवशी पुरणपोळी चा स्वयंपाक बनवला जातो . हा नैवैद्य बैलांना दाखवला जातो , आणि त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जाते . ढोल ताशाच्या गजरात गावांतून गावातील सर्व बैलांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांना ओवाळल जात . बैलपोळ्याच्या सणामुळे गावातील लोकांमध्ये एकोपा आणि प्रेम राहत . हा एक उत्साहाचा क्षण असतो.
पौराणिक कथा
या सणामगे अनेक कथा सांगितल्या जातात पण त्यातील 2 कथा खाली दिल्या आहेत

कथा १ : शिव-पार्वती आणि सारीपाटाचा खेळ
शिव-पार्वती सारीपाट (चौरस) हा खेळ खेळत होते. या खेळात पार्वती जिंकल्या होत्या , पण महादेवांनी स्वतःला विजेता असल्याच म्हंटलं . तेव्हा नंदीबैलाला साक्षीदार म्हणून विचारले असताना त्याने महादेवांचे नाव घेतले. पार्वती मातेला राग आला आणि त्यांनी नंदीला शाप दिला की तो पृथ्वीवर जन्म घेऊन शेतकऱ्याच्या नांगराला जोडला जाशील आणि आयुष्यभर कष्ट कराव लागेल . यानंतर नंदी देवी पार्वती ची क्षमा मागू लागले मग पार्वती देवी म्हंटल्या की वर्षातून एक दिवस शेतकरी तुला देव मानून सन्मान देतील, तुझी पूजा करतील , आणि त्या दिवशी तुला कष्ट कराव लागणार नाही आणि हाच तो दिवस म्हणजे बैलपोळा.
कथा २:कृष्ण आणि पोलासुर राक्षस
भगवान विष्णू कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर आले. त्याचा मामा कंस नेहमी त्याला मारण्यासाठी राक्षस पाठवत असे. लहानपणी वसुदेव-यशोदा यांच्यासोबत राहत असताना कंसाने अनेक असुरांना कृष्णाला मारण्यासाठी पाठवले. त्यापैकी पोलासुर नावाचा राक्षस कृष्णाने मारला. तो दिवस श्रावण अमावास्या होती. म्हणून त्या दिवशीचा सण पोळा म्हणून ओळखला जाऊ लागला
बैलपोळा : आपली संस्कृती
शेतकर्याच आणि बैलाच एक अतूट नात असत , बैल शेतकर्यासोबत दिवस रात्र शेतामध्ये राबतो , एक विश्वासू मित्र असल्यासारख शेतकर्यासोबत राहतो . शेतकऱ्याच्या जीवनात बैल हा केवळ एक प्राणी नसून कुटुंबातील एक सदस्य असतो. बैलपोळ्यासारखे सण आपल्याला सांगतात की आपली संस्कृती हीच आहे – श्रमाला मान देणं, नात्यांना जपणं आणि निसर्गाशी एकरूप होणं. आणि हीच संकृती पुढे अशीच जपली गेली पाहिजे



