Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeकृषी गुणधर्मशेवगा रोज आहारात का समाविष्ट करावा? पोषणमूल्ये, फायदे आणि उपयोग"

शेवगा रोज आहारात का समाविष्ट करावा? पोषणमूल्ये, फायदे आणि उपयोग”

भारतामध्ये ग्रामीण भागात शेवग्याच झाड सहजपणे आढळत. शेवगा हा त्यातील पोषक घटकांमुळे ओळखला जातो. शेवग्याला ‘मोरिंगा’ अस देखील म्हटल जात. शेवग्याच झाड हे सहज पणे व वर्षभर येत. जगभरात याची मागणी वाढली आहे, यामुळे आता शेवग्याला सुपरफुड म्हणून ओळखले जाते. शेवग्याच्या प्रत्येक भागामध्ये पोषक घटक आहेत. जास्त शेवग्याच्या पानांच्या पावडरची मागणी बाजारात वाढली आहे. आज जगभरात मारिंगा पावडर, मोरिंगा टी, मोरिंगा ऑईल याची निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

  1.  शेवग्याची पाने – पावडर

शेवग्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, Vit A, C आणि B काॅम्पलॅक्स भरपूर आढळून येते. शेवग्याच्या 10 ग्रॅम पानांमध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम, गरजेपेक्षा 10 पट जास्त Vit A, संत्र्यापेक्षा 7 पट Vit C इतक्या प्रमाणात असते.

2) यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आणि पचनसंस्था सुधारते.

3) शेवग्यांच्या पानाच्या पावडरीच्या नियमित वापरामुळे पचनक्रिया सुधारते. जर गॅस, अपचन, पोटदुखी यांसारख्या समस्या असतील तर त्या नियंत्रित ठेवते.

4) शेवग्यांच्या पानांमध्ये पालकापेक्षा 9 पट जास्त लोह असते व केळीपेक्षा दुप्पट पोटॅशियम असते.

5) यामुळे रक्तदाब, पित्त नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

6) तोंड येत असेल, आतड्यांच्या जखमा असतील, गळ्याची सुज, खरूज असेल तर ते कमी करण्यास मदत करते.

7) या पानांमध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबीन वाढते.

8) शारिरीक थकवा किंवा जडपणा असल्यास या भाजीने कमी होतो.

9) शेवग्याच्या पानांचा वापर हेल्थ सप्लिमेंट्स आणि औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.

10) छोट्या सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या वायरल आजारांपासून संरक्षण देतात.

11) यामध्ये ॲन्टीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचा ताजीतवानी होते व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडे मजबूत राहतात ज्यामुळे संधिवात आणि हाडाच्या समस्यांमुळे आराम मिळतो.

* शेवग्याची फुले, शेंगा आणि बिया :

शेवग्याची पाने, फुले, शेंगा आणि बिया हे सर्व भाग औषधी आहेत. शेवग्याच झाड 300 हून अधिक रोग बरं करू शकत अस आयुर्वेदात म्हणतात. म्हणून शेवग्याला अमृत असही म्हटलं जातं. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगाचं सेवन करू शकतो. तसेच डोळ्याच आरोग्य जपण्यासाठी देखील शेवग्याच सेवन करू शकतो. तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. वाढलेल वजन नियंत्रित राहत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments