aadhunikshetitantra.com

महाराष्ट्रात पावसाळी हंगामात फायदेशीर भाजीपाला कोणता? लगेच जाणून घ्या

 

महाराष्ट्रात पावसाळी हंगाम (खरीप हंगाम) हा भारतातील शेतीचा सर्वात महत्वाचा कल मानला जातो. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते , यावर्षी मराठवाडा , विदर्भ , पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये माध्यम ते अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच यावर्षी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस ही खूप झाला आहे , पूर्ण मे महिन्यामध्ये वीजांच्या कडकडासह जोरदार सरी पडल्या.

शेतकर्‍यांनी हवामान खात्यांचा अंदाज लक्षात घेऊन आणि आपल्या भागातील जमीन व पावसाच्या तसेच कोणता भाजीपाला फायदेशीर ठरेल यावर योग्य पिकाची लागवड करावी , तर आपण हे बघू की कोणता भाजीपाला व सोबत त्यांच्या वाणाची पण माहिती बघू

 

पावसाळी भाजीपाला

   पावसाळी हंगामात भाजीपाला लागवड करण ही शेतकर्‍यांसाठी कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारा आणि नेहमी मागणीतील पर्याय आहे , यामध्ये भेंडी , दोडका , घोसवळा , वांगी , मिरची , कोथिंबीर , पालक , मेथी , शेपू हा भाजीपाला येतो .

 

भेंडी

या पिकाला बाजारात वर्षभर मागणी असते त्यामुळे , योग्य वाणाची निवड केल्यास उत्पादनात वाढ ही होते . मराठवाडा आणि विदर्भ भागात या वाणांना चांगला प्रतिसाद मिळतो.

ही वाण विशेषता शिफारस केली जातात कारण जलद वाढ , रोगप्रतिकारक असल्यामुळे या वाणांची लागवड करण अत्यंत फायदेशीर ठरत.

 

 वांगी

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा भागात वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते ,  पाण्याचा निचरा योग्य असेल तर हे पीक अधिक फायदेशीर ठरते.

या वाणांची केवळ रोगप्रतीकारक नसून सातत्याने फळधारणा होते त्यामुळे हे वाण शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे

 

 मिरची (हिरवी मिरची)

  कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड फायदेशीर ठरते. पावसाळ्यात मिरचीचे उत्पादन भरपूर येते आणि त्यावेळी शेतकर्‍यांना बाजारभाव ही चांगला मिळतो

 

  दोडका आणि घोसावळा (वेलवर्गीय भाज्या)

  ही वाणं कोकण व घाटमाथा परिसरात विशेषतः फायदेशीर ठरतात. या भाज्यांची वाढ जलद होते आणि विक्रीही नियमितपणे करता येते. बाजारात दररोज विक्रीसाठी शेतकऱ्यांना तयार उत्पादन मिळते.

 

. पालेभाज्या – कोथिंबीर, पालक, मेथी, शेपू

नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद परिसरात पावसाळ्यात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कमी कालावधीत उत्पादन, सतत मागणी आणि कमी खर्च यामुळे या भाज्या लघुउद्योजकांसाठीही फायदेशीर ठरतात.

 

 महाराष्ट्रात पावसाळी हंगामात भेंडी, वांगी, मिरची, दोडका-घोसावळा आणि पालेभाज्यांची लागवड शाश्वत नफा देणारी ठरते. योग्य नियोजन, हवामानानुसार वाणांची निवड आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी कमी कालावधीत अधिक उत्पादन व चांगले दर मिळवू शकतात. त्यामुळे पावसाळा हा केवळ पिकांची सुरुवात नसून, शाश्वत शेतीच्या दिशेने एक मोठे पाऊल असतो पावसाळी हंगामात भाजीपाला.

पावसाळी हंगामात भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी नफ्याची संधी आहे. जाणून घ्या कोणते भाजीपाला पिके फायदेशीर ठरतात, त्यांचे शिफारस केलेले वाण

Exit mobile version