Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीहिमाचलनंतर पंजाबला दिलासा – मोदींकडून 1600 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा

हिमाचलनंतर पंजाबला दिलासा – मोदींकडून 1600 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथे पावसाने हाहाकार उडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा हवाई आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी राज्यासाठी रु. 1600 कोटींच्या विशेष मदत पॅकेजची घोषणा केली. विशेषत: हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे प्रचंड हानी झाली असून शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे पूरग्रस्त भागामध्ये मदत पोहोचवण्याचे काम जलद सुरु आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरस्थिती भयंकर वाढली आहे या दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा जोर खूप वाढला आहे त्यामुळे या राज्यांमध्ये लोकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना आलेल्या महापुरामुळे गावागावात पाणी शिरलं शेकडो रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. शोकडो लोक जखमी झाली असून शेकडो कुटुंबाना आपली घरे सोडून सुरक्षित स्थलांतरित करावे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले हिमाचल प्रदेशातील पुरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी गुरदासपूर जिल्ह्यात हवाई सर्वेक्षण करून राज्य सरकारसोबत दुरुस्ती व उभारणी संदर्भात चर्चा केली . यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती घेतली

.हिमाचल प्रदेशासाठी त्यांनी 1500 कोटींची मदत जाहीर केली. आणि यानंतर पंजाब या राज्यासाठी 1600 कोटींची मदत जाहीर केली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्थितीची पाहणी केली, त्यांनी या हवाई दौऱ्यामध्ये त्यांनी तरण तारण, अमृतसर आणि गुरुदास पूर या जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे. शेतकर्‍यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि पंजाब राज्यासाठी त्यांनी 1600 कोटी जाहीर केले . यामध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबियासाठी रु 2 लाख रक्कम तर जखमींना रु 50000 रक्कम जाहीर केली त्यानंतर त्यांनी जवनांशी सुद्धा संवाद साधला . यावेळी पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर , राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया , आणि भाजप चे नेते व अधिकारी उपस्थित होते . सुनील जाखर यांनी पुरांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानबद्दल माहिती दिली . तसेच पूरग्रस्त शेतकर्‍यांनीही आपल झालेल्या नुकसानबद्दल दुख व्यक्त केल . यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नी मदतीच आश्वासन दिल .

केंद्र सरकारने ही मदत सुरुवातीची तातडीची पावले म्हणून जाहीर केली आहे .सध्या तरी ही घोषणा पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments