केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान निधि योजनेचा 20 व हप्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे . या योजनेअंतर्गत शेतकर्यांना वर्षाला 6000 रु लाभ मिळतो . जिल्ह्यातील 5 लाख 49 हजार शेतकर्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रु जमा झालेत . म्हणजेच एकूण 109 कोटी 90 लाखांची रक्कम वितरित करण्यात आली आहे . सरकारने सुरू केलेली ही योजना महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेतकर्यांमध्ये ही आनंदाच वातावरण आहे
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,सध्याच्या पेरणीच्या काळात ही रक्कम शेतकर्यांसाठी फार मोलाची ठरते विशेषत: अल्पभूधारक शेतकर्यांसाठी ही योजना दिलासदायक ठरत आहे . आजवर सलग 19 हप्ते वेळेवर शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले असून शेतकर्यांमध्ये या योजनेबद्दल अढळ विश्वास आणि समाधान आहे , या योजनेत सातत्य राखणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच यश आहे .
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांपैकी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी योजना ठरली आहे

तालुकानिहाय ‘किसान सन्मान निधी‘ प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून, जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा थेट लाभ मिळाला आहे. खालीलप्रमाणे तालुकानिहाय रकमा वितरित करण्यात आल्या आहेत:
अकोले – 34,948 शेतकऱ्यांना ₹6.99 कोटी
जामखेड – 29,058 शेतकऱ्यांना ₹5.81 कोटी
कर्जत – 43,610 शेतकऱ्यांना ₹8.72 कोटी
कोपरगाव – 29,640 शेतकऱ्यांना ₹5.93 कोटी
अहिल्यानगर – 31,020 शेतकऱ्यांना ₹6.20 कोटी
नेवासा – 54,289 शेतकऱ्यांना ₹10.86 कोटी
पारनेर – 50,383 शेतकऱ्यांना ₹10.08 कोटी
पाथर्डी – 39,955 शेतकऱ्यांना ₹7.99 कोटी
राहाता – 24,108 शेतकऱ्यांना ₹4.82 कोटी
राहुरी – 38,563 शेतकऱ्यांना ₹7.71 कोटी
संगमनेर – 59,128 शेतकऱ्यांना ₹11.83 कोटी
शेवगाव – 41,901 शेतकऱ्यांना ₹8.38 कोटी
श्रीगोंदा – 50,571 शेतकऱ्यांना ₹10.11 कोटी
श्रीरामपूर – 22,343 शेतकऱ्यांना ₹4.47 कोटी
एकूण कोट्यवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना हातभार लागत आहे, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सरकारविषयी समाधान वाढत आहे.
“‘किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ तुम्हाला मिळालाय का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा!”



