Friday, January 16, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeकृषी गुणधर्मGI Food : भौगोलिक निर्देशांक, आजरा घनसाळ तांदळाचे वैशिष्ट्य

GI Food : भौगोलिक निर्देशांक, आजरा घनसाळ तांदळाचे वैशिष्ट्य

GI Food आजरा घनसाळ तांदूळ : म्हणजे असा अन्नपदार्थ, जो एखाद्या ठरावीक भागातच पिकतो आणि ज्याची चव, सुगंध व गुणवत्ता त्या भागाशी जोडलेली असते. त्या भागातील माती, पाणी, हवामान आणि शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत यामुळे असे अन्न खास बनते.

वैशिष्ठ्ये

  • भरपूर पाऊस आणि सुपीक जमीन असल्यामुळे इथे भातशेती चांगली होते.
  • आजरा म्हटलं की लोकांच्या लगेच लक्षात येतो तो घनसाळ तांदूळ.
  • ‘घन’ म्हणजे छान सुवास आणि ‘साळ’ म्हणजे भात—म्हणून घनसाळ म्हणजे सुगंधी भात.
  • हा घनसाळ तांदूळ गेले 200 वर्षापासून घेतला जातो.
  • हे एक देशी वाण आहे.
  • रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या पिकावर फारशी फवारणी करावी लागत नाही.
  • या भातामध्ये जीवनसत्त्वे A, B, C आणि D आहेत.
  • तसेच लोह (Iron) भरपूर प्रमाणात असून त्यात औषधी गुणधर्मही आहेत.
  • आजरा घनसाळ तांदूळ शिजल्यावर मऊ लागतो, छान वास येतो आणि चवीला खूपच उत्तम असतो.
  • म्हणूनच लोक त्याला जास्त पसंती देतात.
  • या तांदळाला GI टॅग मिळाल्यामुळे त्याची खरी ओळख जपली जाते आणि बनावट मालापासून संरक्षण मिळते.

नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळे आजरा आणि कोकणलगतच्या भागात घनसाळ भाताचे उत्पादन सातत्याने होते. पूर्वी फक्त सुवासामुळे या तांदळाला मागणी होती, मात्र विक्री प्रामुख्याने जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहायची. त्यामुळे उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नव्हता. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि आजरा घनसाळची ओळख वाढावी यासाठी GI मानांकनासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि याला GI मानांकन मिळालं. आणि आता या तांदळला खूप पसंदी दिली जात आहे.

GI Food आजरा घनसाळ तांदूळ

आजरा घनसाळच्या तांदुळचा सुवास :

पावसाळ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून पाणी खाली येते. या पाण्यासोबत जंगलातील कुजलेला पाला-पाचोळा, झाडांची पाने, तसेच सेंद्रिय पदार्थ वाहून येतात. हे सगळे घटक डोंगर उताराला लागून असलेल्या सपाट शेतजमिनीत साचतात.

या कुजलेल्या पाला-पाचोळ्यातून अनेक नैसर्गिक अन्नघटक तयार होतात. पावसाचे पाणी हे अन्नघटक जमिनीत मिसळते आणि ते जांभा खडकाच्या मातीत खोलवर साठून राहतात

या तांदळाला असा सुवास नेमका कसा मिळतो, याबाबत शास्त्रीय पातळीवर सध्या अभ्यास सुरू आहे. मातीतील अन्नघटक, हवामान, पाण्याची गुणवत्ता आणि पारंपरिक शेतीपद्धती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम घनसाळ तांदळाच्या खास गुणधर्मांवर होत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

हे ही वाचा : रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट: जानेवारीपासून कुणाला किती धान्य मिळणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments