Monday, October 20, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeपशुधनफायदेशीर कुक्कुटपालन: जाणून घ्या Plymouth Rock कोंबडीची माहिती आणि बाजारभाव

फायदेशीर कुक्कुटपालन: जाणून घ्या Plymouth Rock कोंबडीची माहिती आणि बाजारभाव

शेतकरी शेतीसंलग्न अनेक व्यवसाय करतात, याच व्यवसायापैकी एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. हा एक अतिशय फायदेशीर व जलद आर्थिक मदत देणारा व्यवसाय आहे

  अंडी आणि कोंबडीच्या मांसाला देशभरात खूप मागणी आहे त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करतात.Plymouth rock ही कोंबडी भारतात नवीन आलेल्या परदेशी जातीपैकी एक आहे . ही मूळता अमेरिकेतील परांपरिक जात आहे , साधारणता 200-250 अंडी प्रती वर्ष देते.

Plymouth Rock कोंबडी –

  ही कोंबडी वर्षाला 200-250 देते म्हणून भारतात खूप लोकप्रिय झाली आहे, हिचा रंग प्रामुख्याने काळा-पांढरा पट्ट्यांसारखा (Barred pattern) असतो, म्हणून ती “Barred Plymouth Rock” म्हणूनही ओळखली जाते. भारतात ही जात आता बऱ्याच ठिकाणी देशी कोंबडीसारखीच लोकप्रिय झाली आहे. वजन: नर – ३ ते ४ किलो, मादी – २.५ ते ३.५ किलो . अंड्याचा रंग हलका तपकिरी असतो.

फायदेशीर व्यवसाय

या जातीची पिलं बाजारात ७० ते ८० दराने मिळतात. ही कोंबडी तुलनेत थोडी जास्त खाद्य खात असली, तरीही तिचं वजन १ किलो होण्यासाठी सुमारे ९० ते १०० दिवस लागतात. तिच्या अंड्यांची किंमतदेखील सामान्य देशी अंड्यांपेक्षा जास्त आहे — प्रत्येक अंड्यास ५० ते ७० पर्यंत बाजारभाव मिळतो.

याचं मांसही उच्च प्रतीचं समजलं जातं आणि स्थानिक बाजारात ३०० प्रतिकिलो दराने विकलं जातं, त्यामुळे या जातीच्या कोंबडीपालनातून शाश्वत नफा मिळवणं शक्य आहे.

Plymouth Rock कोंबडीची वैशिष्ट्ये

1. रंग व ओळख : काळा आणि पांढऱ्या पट्ट्यांचा आकर्षक रंग— सहज ओळखता येते.

2. वाढीचा कालावधी : साधारणतः 90 ते 100 दिवसांत 1 किलो वजन होते.

3. जास्त खाद्य क्षमतेची : इतर जातींपेक्षा अधिक खाद्य खातेअंड्याचे उत्पादन : दर महिन्याला सरासरी 12–15 अंडी देते.

4. अंड्याची किंमत : स्थानिक बाजारात ₹50 ते ₹70 प्रति अंडे दर मिळतो.

5. मांसाचा दर : बाजारात या जातीच्या मांसाला ₹300 प्रति किलो दर मिळतो.

6. पिल्लांची किंमत : या जातीच्या पिल्लांची किंमत साधारणतः ₹70 ते ₹80 दरम्यान असते.

7. संकट सहनशीलता : हवामान बदल, आजार यांना मध्यम सहनशीलता आहे – वेळेवर लसीकरण आवश्यक.

8. उत्तम बाजारमूल्य : गावाकडे, शहरांमध्ये आणि ऑर्गेनिक उत्पादनांसाठी ही जात विशेष पसंतीस उतरते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments