Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीपहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार – सुरक्षा दलांचं ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी!

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार – सुरक्षा दलांचं ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी!

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यान पूर्ण भारतावर दुखाचा डोंगर पसरला होता . या हल्ल्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता , त्या भयंकर घटनेचा मास्टरमाइंड आणि त्याचे दोन साथीदार अखेर सोमवारी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत ठार करण्यात आले. सोमवारी संसदेत एकीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’वर तीव्र चर्चा सुरू असतानाच, काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी पहलगाम हल्ल्यातील ३ दहशतवाद्यांना ठार केल्याची बातमी समोर आली.

ऑपरेशन महादेव‘ – संपूर्ण घटनेचा क्रम

·   भारतीय सुरक्षा दलांनी 28 जुलै 2025 रोजी श्रीनगरजवळ असलेले डाचीगाम च्या लिवास या परिसरात राबवण्यात आल .

·   इंडियन आर्मी , जम्मू काश्मीर पोलिस , आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे येऊन ऑपरेशन महादेव राबवल.

·       मिळालेल्या माहितीनुसार, डाचीगाम जंगलात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि मेंढपाळांच्या मदतीने सुरक्षादलांनी सुमारे १४ दिवस गुप्त ट्रॅकिंग आणि विशेष सिग्नल-आधारित तंत्रज्ञान वापरून दहशतवाद्यांचे अचूक ठिकाण शोधून काढले.

·       यानंतर दहशतवाद्यांवर थेट कारवाई करण्यासाठी आर्मी कडून वेगवेगळ्या टिम करण्यात आल्या आणि 28 जुलै 2025 रोजी सकाळी  11.30 च्या दरम्यान इंडियन आर्मी कडून अचानक हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांना संपवण्यात आल

·       या हल्ल्यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर चा वरिष्ठ कमांडर हाशीम मुसा याचा ही शेवट झाला त्याच्याबरोबर च असलेले अबु हामजा आणि यासिर यांना ही ठार केले

ऑपरेशन ‘महादेव’ चं नाव का ठेवण्यात आलं

‘ऑपरेशन महादेव’ हे नाव मोहिमेच्या भौगोलिक, धार्मिक आणि मानसिक संदर्भातून ठरलं. ही कारवाई श्रीनगरजवळील डाचिगाम नॅशनल पार्कच्या परिसरात असलेल्या महादेव पर्वताच्या पायथ्याशी पार पडली, म्हणून या स्थानाशी त्याचा थेट संबंध आहे. आणि दहशतवाद्यांचा नाश करणारं या मोहिमेचं स्वरूप अधोरेखित करतं. याच दिवशी, २८जुलै२०२५ श्रावण महिन्याचा पहिला सोमवार होता—शिव‑भक्तांसाठी विशेष पवित्र दिवस—ज्यामुळे या नावाला आणखी भावनिक व अध्यात्मिक अधोरेखा मिळाली. ऑपरेशन महादेव” ही केवळ एक कारवाई नव्हे, तर देशाच्या सुरक्षेसाठी अविरत सज्ज असलेल्या भारतीय सुरक्षा दलांच्या धैर्याचं, नियोजनाचं आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतिक आहे. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांचा सूड घेत, या ऑपरेशनने दहशतीवर निर्णायक प्रहार केला आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments