Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडी जायकवडी धरण ७८% भरले; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक स्थिती

 जायकवडी धरण ७८% भरले; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पैठण येथे जायकवडी धरण आहे . या धरणाला नाथसागर हे ही नाव आहे . आशिया खंडातील मोठे मातीच धरण म्हणून प्रसिद्ध आहे . मराठवाड्यातील जवळजवळ 2-3 लाख हेक्टर क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे . गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाचे क्षेत्रफळ आणि पाण्याची साठवण क्षमता हे त्याचे विशेष वैशिष्ट्य आहे.

     25 जुलै पर्यंत 2025 रोजी धरण 78.67% भरले आहे , यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर एक आशा आहे त्यामुळे जायकवडी धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे . मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी समाधानकारक पाण्याचा साठा आहे . खरीप हंगामासाठी पुरेशा पाण्याची खात्री निर्माण झाली आहे.

गोदावरी नदीपात्रातून जायकवडी धरणात पाण्याची आवक आहे, या स्थिर आणि वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. हे चित्र पाहता, नजीकच्या काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी विशेष त्रास सहन करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.

धरणाची पातळी व साठा

  • फूटामध्ये उंची: १५१७.८४ फूट
  • मीटरमध्ये उंची: ४६२.६३८ मीटर
  • एकूण जलसाठा: २४४६.०७७ दलघमी
  • वापरण्यायोग्य साठा: १७०७.९७१ दलघमी
  • साठ्याची टक्केवारी: ७८.६७%

शेतकऱ्यांना दिला मोठा आधार

·        जूनपासून नाशिक आणि परिसरात समाधानकारक पावसाची नोंद झाली. याचा थेट परिणाम जायकवडी (नाथसागर) धरणाच्या साठ्यावर दिसून येतो आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा ७८.६७% असून, लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

·        सध्या धरणातून कोणताही सांडवा विसर्ग (spillway discharge) करण्यात आलेला नाही, त्यामुळे नियंत्रित पाणीयोजना राबवली जात आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यांतून पाणीपुरवठा सुरू असून त्याचा थेट शेतीसाठी मोठा फायदा होत आहे. धरणाचा साठा सातत्याने वाढत असून, त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

·        नाथसागर धरणाची सद्यस्थिती पाहता, शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत आशावाद आहे. जर आगामी काही दिवसांत पावसाची संततधार सुरू राहिली, तर धरण १००% भरून शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.

·        दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभाग सतत धरणाची पातळी, आवक आणि विसर्ग यावर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आणि योग्य नियोजन होण्यासाठी पाण्याचा वापर काटेकोरपणे केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments