लग्नसामारंभ असो किंवा एखाद्या पेशंट ला भेटायला जाताना आपण सहज एक बूके घेऊन जातो , या बूके मध्ये सर्वात आकर्षक दिसणार फूल म्हणजे जर जरबेरा Gerbera. मोठ्या आकाराची , विविध रंगाची , फुले असतात यामध्ये लाल, गुलाबी, पिवळा, आणि पांढरा असे अनेक रंग असतात. जगामध्ये मोठ्या प्रमाणात याची शेती केली जाते महाराष्ट्र मध्ये नाशिक,सातारा, सांगली,कोल्हापूर,नगर,सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते Gerbera ची मागणी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणूनच त्याची निर्यात देखील फायदेशीर ठरते. एकदा लागवड केल्यानंतर झाड वर्षभर फुले देत असल्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने उत्पन्न मिळते. याशिवाय Gerbera ची किंमत बाजारात तुलनेत चांगली असल्यामुळे कमी क्षेत्रात जास्त नफा मिळतो. यामुळे Gerbera हे आधुनिक आणि फायदेशीर पीक मानले जाते.
जरबेरा लागवड प्रामुख्याने ग्रीनहाऊस किंवा शेडनेट मध्ये केली जाते, कारण यामुळे नियंत्रणात हवामान व अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते
जमीन
18 ते 30 अंश सेल्सियस तापमान आणि सेंद्रियदृष्ट्या समृद्ध, निचरा होणारी, फुप्फुशीत माती लागवडीसाठी योग्य मानली जाते आणि मातीचा pH 5.5 ते 6.5 दरम्यान असावा.
पूर्वमशागत
जरबेरा लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर गवत, मुळे आणि दगडधोंडे काढून टाकावेत. प्रति गुंठा १५–२० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत मिसळावे. माती निर्जंतुकीकरणासाठी ट्रायकोडर्मा किंवा फॉर्मलिनचा वापर करावा. बेड तयार करताना मातीसोबत कोकोपिट, वाळू व व्हर्मी-कंपोस्ट यांचे मिश्रण वापरावे. आणि शेवटी ड्रिप सिंचन व्यवस्था लावून लागवडीसाठी मोकळी जमीन तयार ठेवावी.
जरबेरा लागवडीची योग्य वेळ:
जरबेरा लागवडीसाठी जुलै ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो, कारण यावेळी हवामान मध्यम (18°C ते 30°C) असते, जे रोपांची चांगली वाढ व फुलांची गुणवत्ता सुधारते. ग्रीनहाऊस किंवा शेडनेटमध्ये लागवड करत असल्यास वर्षभर कोणत्याही वेळी लागवड शकतात.

सुधारित वाण
Rosalin – गुलाबी फुले, आकर्षक आणि व्यापारी मागणीसाठी उपयुक्त
Dana Ellen – पांढऱ्या रंगाची फुले, विशेषतः डेकोरेशनसाठी
Salmon Rose – गुलाबी छटा असलेली फुले, सौंदर्यात्मक वापरात लोकप्रिय
खत व्यवस्थापन
व्हर्मी-कंपोस्ट 10–15 टन प्रति एकर मिसळा. मायक्रोन्युट्रिएंट्स (जस्त, बोरोन) योग्य प्रमाणात द्या जरबेरा लागवडीसाठी नायट्रोजन (N), फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K) संतुलित प्रमाणात देणे आवश्यक आहे. नायट्रोजन पानांची वाढ आणि फॉस्फरस फुलांची गुणवत्ता सुधारतो. पोटॅशियम फुलांची टिकाऊपणा वाढवतो. मायक्रोन्युट्रिएंट्स जसे जस्त, बोरोन, मॅग्नेशियम योग्य प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे. NPK खत 20-20-20 प्रमाणात 2–3 आठवड्यांत एकदा द्यावे
पाणी व्यवस्थापन
ठिबक सिंचन वापरताना सरासरीने प्रत्येक झाडास दररोज 500 ते 700 मिली लिटर पाणी देणे योग्य ठरते. हवामान, मातीचा प्रकार आणि झाडाची वाढ पाहून हे प्रमाण थोडे कमी–जास्त होऊ शकते.
जरबेरा फुलांची काढणी व उत्पादन
काढणी लागवडीनंतर ७०–८० दिवसांनी सुरू होते. दरवर्षी एका रोपातून सरासरी ४०–५० फुले मिळतात. पॉलीहाऊस व्यवस्थापन चांगले असल्यास प्रति गुंठा १०,००० ते १२,००० फुलांचे उत्पादन मिळते