Friday, January 16, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

HomeइतरAadhunik sheti tantraऊसाचे पाचट (पाला) काढण्याचे फायदे

ऊसाचे पाचट (पाला) काढण्याचे फायदे

ऊसाचे पाचट : ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. तर आज आपण उसाचे पाचट म्हणजेच उसाचा पाला काढण्याचे फायदे बघू. शेतकरी ऊसाचा पाला योग्य वेळी काढत नाहीत. पण जर उसाचा पाला योग्य वेळी काढल्यास उसाच्या वाढीला व पिकाच्या उत्पादनाला मोठा फायदा होतो.

उसाचे पाचट म्हणजे काय ?

ऊस काढल्यानंतर शेतात साचलेली वाळलेली पाने, कोरडी खोड आणि ऊस तोडताना पण जमिनीवर पडतात. यालाच पाचट म्हणतात. याचे योग्य व्यवस्थापन हा ऊस शेतीतील महत्वाचा भाग आहे. वाळलेल्या पणामुळे जमिनीवर हवा आणि सूर्यप्रकाश पोहोचत नाही. याचा परिणाम नवीन फुटवे उशिरा येतात आणि कमी प्रमाणात येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या पायांशी साचलेल पाचट वेळोवेळी काढणे गरजेचे असते. पाचट काढल्याने जमीन मोकळी राहते आणि मुळांपर्यंत हवा, पाणी, पोषणद्रव्ये सहजपणे पोहचतात.

उसाचे पाचट काढण्याचे फायदे

1) उसाचा पाला काढल्याने संख्या नियंत्रणात राहते.

पाचट काढताना लहान कमकुवत मरके कोंब काढले जातात . त्यामुळे चांगले कोंब व संख्या नियंत्रणात राहते.

2) हवा खेळती राहते व उसाची जाडी वाढते.

उसाच्या बुडातील पाला निघाल्यामुळे, हवा आणि सूर्यप्रकाशामुळे प्रकाशसंश्लेषण अधिक चांगले होते .यामुळे झाडाच्या भोवती हवा खेळती राहते व उत्पादन वाढते.

3) नवीन वॉटरशूट जोमदारपणे येतात.

उसाच्या बुडतील सर्व साचलेले पाचट काढल्याने , नवीन वॉटरशूट सहजपणे फुटतात . व हे नवीन फुटवे जोमदार व वजनदार येतात.

4) मल्चिंगमुळे तापमान नियंत्रण व ओलावा टिकतो.

उसाचा कोवळा पाला योग्यवेळी जमिनीवर पाचटाचे आच्छादन केल्यास तापमान संतुलित ठेवल्यास मदत होते, उन्हाळ्यात पाण्याची बाष्पीभवन होण्याची हानी कमी होते . आणि पाण्याची बचत होते. तसेच यामुळे ताणाचा प्रादुर्भाव कमी होतो.

5) वाळलेला पाचट सेंद्रिय खतांमध्ये प्रवर्तित होतो.

योग्य वेळी बुडातील कोवळा पाला किंवा वाळलेला पाला काढून तो जमिनीवर आच्छादन केल्यास , तर तो काहीच दिवसात कुजतो. त्यातुन तयार होणारे सेंद्रिय घटक मातीतील सूक्ष्मजीवांना पोषण देतात. तसेच पाचट कुजताना त्यातून कार्बनयुक्त वायू (CO2) बाहेर पडतो. हा वायू प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी उपयुक्त असतो.

6) कीड नियंत्रणास मदत होते.

पाचटाखाली कांडी कीड (Stem Borer), मिलीबग तसेच पायरीला यांसारख्या किडींचे प्रमाण वाढते. पाचट काढल्याने कीड नष्ट होते . व प्रादुर्भाव कमी होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments